हतनुर कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या यावल येथील दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

जळगाव

यावल | सिटिझन मिरर वार्ता

बोरावल रस्त्यावरील हतनूर धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यावल घडली आहे.
बोरावल रस्त्यावरील हतनूर धरणाचे कालव्यात पाणी सोडले असल्यामुळे यावल शहरातील सुदर्शन चित्र मंदिर परिसरातील स्वामी विवेकानंद नगर येथील गणेश निळकंठ दुसाने (सोनार) (वय १६), दीपक जगदीश शिंपी व त्यांचे दोन मित्र काल बुधवार दिनांक ५ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. या कालव्यात शेत पिकांसाठी पाणी सोडण्यात आलेले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने गणेश दुसाने व जगदिश शिंपी या मुलांचा अंत झाला.
आज पहाटे या मुलांचा शोध घेण्यासाठी पट्टीचे पोहणाऱ्या आठ जणांनी पाण्यात शोधमोहीम राबवली.तब्बल सहा- साडेसहा तासानंतर दोघांचे मृतदेह कालव्याच्या पाण्यात गाळात आणि जाळीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *