मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात उस्मानिया पार्क येथील दीड वर्षीय बालक गंभीर जखमी

जळगाव

या घटनेमुळे जळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर


जळगाव | सिटिझन मिरर वार्ता

अंगणात खेळत असलेल्या दीड वर्षाच्या बालकावर अचानक मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याने बालक गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात आज गुरुवार दिनांक ६ मे रोजी सकाळी घडली.या घटनेमुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून जळगावकरांकडून अनेकदा मागणी करुन देखील महापालिकेकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शाहरुख खान हा दीड वर्षाचा मुलगा आपल्या अंगणात खेळत असताना अचानक त्याच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून त्याच्या मानेचा लचका तोडून गंभीर जखमी केले.हा प्रकार मुलाची आई नाजमी बी यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली.सुदैवाने परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन संबंधित बालकाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले. यामुळे या बालकाचा जीव वाचला.मुलावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *