वंचित बहुजन आघाडीच्या उमरखेड तालुकाध्यक्षपदी संतोष जोगदंडे तर शहराध्यक्षपदी अॅड. रफीउल्ला खान यांची निवड

विदर्भ

उमरखेड जि. यवतमाळ‌|सिटीझन मिरर वार्ता

वंचित बहुजन आघाडीच्या उमरखेड तालुका व शहर कार्यकारिणी निवडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात येऊन तालुकाध्यक्षपदी  संतोष जोगदंडे सर शहराध्यक्षपदी अॅड. रफी उल्ला खान यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब  आंबेडकर यांच्या आदेशाने यवतमाळ जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी केली आहे.

‌ नवीन कार्यकारणीत अशोक दामोधर यांना सोशल मीडिया प्रमुख बनविण्यात आले असून शहर सचिवपदी सैय्यद जमीर, शहर संघटक पदी मीर मुस्विर अली, शहर महासचिवपदी युवराज बंडगर यांची निवड करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा महासचिव डी.के. दामोधर, जाॅन्टी विनकरे, संबोधी गायकवाड, निकेश गाडगे यांची उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *