पाडळसे येथील गावठी हातभट्टी वर फैजपूर पोलिसांची धडक कारवाई

जळगाव

फैजपूर ता.यावल|डॉ. मोहन साळुंखे

फैजपूर पोलिसांनी आज धडक कारवाई करत पाडळसे येथील गावठी दारू भट्टी उध्वस्त केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे गावठी दारू  विक्री करणाऱ्यांसह  बेवड्याची चांगलीच पळापळ झाली.

कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असताना फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाडळसे येथे मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू गाळण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. फैजपूर विभागाचे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश वानखेडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, सहायक फौजदार सांगळे, किरण चाटे, विकास सोनवणे, महेश वंजारी, उमेश सानप यांनी सापळा रचून आरोपी चिनी महाराज उर्फ भास्कर कोळी यास मुद्देमालासह अटक केली. यावेळी दारू गाळण्याच्या  साधनासह कच्चे रसायान व तयार दारू असा एकूण ३१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपिविरुद्ध  गु.र.५५/२१ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (फ)(ई) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *