खिरवड येथे कोरोना लसिकरणाचा नागरिकांनी घेतला लाभ

जळगाव

रावेर |नजमोद्दीन शेख

वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत रावेर तालुक्यातील खिरवड येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत कोविशिल्ड लसिकरणाचा ग्रामस्थांनी लाभ घेतला.

अत्यंत शांततेत व नियोजन पद्धतीने राबवलेल्या लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला लोकनियुक्त सरपंच निळकंठ चौधरी यांनी कोविशिल्ड लसिकरणाचा पहिला डोस घेतला. यानंतर ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. खिरवडसह नेहता व मोरगाव  येथील ९० नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आला.

खिरवड ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच निळकंठ चौधरी व ग्रामसेवक एच.डी. शिरसाठ यांच्या सहकार्यातून पार पडलेल्या लसीकरण मोहिमेत वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, नर्स व आशा वर्कर यांना ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *