आजाद समाज पार्टीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी अशोक भालेराव

विदर्भ

यवतमाळ| राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी)

भीम आर्मीचे संस्थापक तथा आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली आजाद समाज पार्टीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी पुसद येथील अशोक भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.

‌     पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान व प्रदेश मुख्य महासचिव मनिष साठे यांनी अशोक भालेराव यांची निवड केली.नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

‌ ‌          अशोक भालेराव हे भीम आर्मीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष असतांना  त्यांनी युवकांचे मोठे संघटन करून आंदोलने केली होती.‌ त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आजाद समाज पक्षाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

लवकरच पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असुन जिल्हाभर पक्षाचा विस्तार करण्यासाठी दौरा करणार असल्याचे अशोक भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *