जिल्हा न्यायालयात कोविड लसीकरण

Uncategorized जळगाव

जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी व वकिलांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण शिबिराचे करण्यात आले आयोजन


जळगाव|खंंडु महाले

जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी व वकील संघ आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी जिल्हा न्यायालय परिसरात कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ६ मे  ते दिनांक ८ मे २०२१ पर्यंत राबविण्यात आलेल्या लसीकरण शिबिराचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. दिलीप बोरसे, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. ठोंबरे, जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्याम शिंदे, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक प्रमोद नगरकर, जिल्हा न्यायालयाचे अधिक्षक व्ही.एस. काळकर हे उपस्थित होते.

यशस्वितेसाठी जळगाव जिल्हा वकील संघ व जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्था, जिल्हा न्यायालयीन लघुलेखक संघटना, गट क न्यायालीन कर्मचारी संघटना,
जिल्हा न्यायालय बेलिफ संघटना, न्यायालयीन चतुर्थ कर्मचारी संघटना व त्यांचे  पदाधिकारी
प्रकाश सपकाळ, निलेश सुर्यवंशी, प्रशांत महाजन, कल्पेश पाटील, भुषण ब-हाटे, मनोज साळुखे, सौ.
मंजुश्री त्रिवेदी, आर.डी.जोशी, प्रकाश सुर्यवंशी, सुचित पारीख, मनिष जैन, सुजित चंदनकर, मंगेश
कुळकर्णी, ललीत चौधरी, अनिल बारी, अनिल शिंदे, कैलास पाटील, सागर कोळी, मयुर चव्हाण, परेश
येवले, सचिन महाजन, अनिल खैरनार व इतर न्यायालयीन कर्मचारी तसेच, वकील संघाचे सचिव अॅड.दर्शन देशमुख, उपाध्यक्ष अॅड. प्रभाकर पाटील व जिल्हा वकील संघ कार्यकारणी सदस्य यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *