फैजपूर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांची मागणी

जळगाव

फैजपूर या.यावल | डॉ.मोहन सांळुखे

फैजपुर शहराची लोकसंख्या सुमारे ४० ते ५० हजारादरम्यान असतांना शहरात कोविड लसीकरण केंद्र नसल्याने शहरातील नागरिकांना नजीकच्या  गावातील आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरणासाठी संपर्क साधावा लागत आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने फैजपूर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी केली आहे.

यावल व रावेर तालुक्याला जोडणारा दुवा म्हणून फैजपूर शहर ओळखले जाते. फैजपूर येथे प्रांताधिकारी कार्यालय व डिवायएसपी कार्यालय आहे. येथिल बाजारपेठ मोठी आहे. अशा महत्त्वपूर्ण शहरात कोविड लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.पंरतू शहरात लसीकरण केंद्र  नसल्याने शहरातील नागरिकांना न्हावी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पाडळसे,हिंगोणे या ठिकाणी लसीकरण करण्यासाठी जावे लागत आहे. मात्र, एवढ्या दुर येवुन सुद्धा लसीकरणास नंबर लागत नसल्याने नागरिकांना  पुन्हा पायपीट करावी लागत आहे.

फैजपूर शहरात महाराष्ट्र दिनापासून कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाने माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांना दिले होते.पंरतू अद्यापही फैजपूर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने फैजपूर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करावे. अन्यथा भाजपातर्फे उपोषण करावे लागेल असा इशारा माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *