मृतदेहाची अदलाबदल : संतप्त नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड

विदर्भ

यवतमाळ | राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी)

नेहमीच वादग्रस्त असलेल्या यवतमाळ शहरातील डॉ. शहा कोविड रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.रुग्णालयात चक्क  मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समोर येताच नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारत रूग्णालयाची तोडफोड करत संताप व्यक्त केला.


यवतमाळ येथील नामांकित असलेले अॅड. अरुणराव गजभिये यांना कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी डॉ.शहा कोविड रुग्णालयात दाखल झालेले होते. सात दिवस उपचार घेतल्यानंतर शनिवरी अॅड.गजभिये यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी  देऊन रविवारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेह घेऊन नातेवाईक पांढरकवडा रोडवर स्मशाभूमीत पोहचल्यावर मृतदेह उघडून बघितल्यावर  अॅड. गजभिये  ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ्ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ्््ॅॅॅ्ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ्््््ॅ्ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ््््ॅ्ॅॅॅॅॅॅॅॅॅ यांच्या ऐवजी दुसऱ्याच इसमाचे शव दिसुन आले. यानंतर अॅड. गजभिये यांचा मुलगा अरुण गजभिये व नातेवाईकांनी डॉक्टर शहा यांच्या रुग्णालयात धाव घेऊन जाब विचारला. मात्र  प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी डॉक्टर शहा व रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले.

दरम्यान, या घटनेनंतर अवधूतवाडी पोलिसांनी  रुग्णालयात धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *