बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड रुग्णालयात फळे वाटप

विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस


यवतमाळ | राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी)

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा ६७ वा वाढदिवस वंचित बहुजन आघाडीच्या वणी तालुका व शहरातील कार्यकर्त्यांनी कोविड रुग्णालयात फळे वाटप करून साजरा केला.

परसोड येथील कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल ७० रुग्णांना  तसेच वणी  येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल २५ कोविड रुग्णांना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मार्फत फळे वाटप करण्यात आली.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रल्हादभाऊ चामाटे,चंद्रमनी दसोडे,सुभाष लसंते,बंडूभाऊ गणवीर,गौतम जिवने,शारदाताई मेश्राम,(ग्रा.प.सदस्य),वैशाली उईके,विशाखा लोखंडे,नीलिमा उमरे,प्रियाताई भगत,संगीता वानखेडे,पुखराज खैरे(ग्रा.प.सदस्य),रज्जत सातपुते,गजानन गोंडे,प्रशांत चंदनखेडे,संस्कार तेलतुंबळे,हर्षल शेंडे,अंकित पाझारे, तन्मय लामसोगे,विनोद गजभिये,गौरव जवादे,आकाश बोरकर,आकाश भगत,प्रशांत गाडगे यांच्यासह क्षयरोग पर्यवेक्षक विजयराव धोंडगे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *