वाळू तस्कराची मुजोरी : वन कर्मचाऱ्याच्या अंगावर रेतीने भरलेले ट्रॅक्टर चालवून ठार मारण्याचा प्रयत्न

जळगाव

चाळीसगाव तालुक्यातील धक्कादायक घटना


वन कर्मचारी जखमी ; खाजगी रुग्णालयात उपचार सुरू


चाळीसगाव |सिटीझन मिरर वार्ता

डोंगरी नदीपात्रातून वाळूची अवैधरीत्या तस्करी करणाऱ्याने पाटणादेवी जंगलात गस्त घालणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या अंगावर  भरलेले ट्रॅक्टर चालवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  या घटनेत वन कर्मचारी जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संदर्भात प्राप्त माहिती अशी की, पाटणादेवी अभयारण्यातील जंगलात डोंगरी नदीपात्रात प्रचंड प्रमाणात वाळू तस्करी होत आहे. रात्री  वनरक्षक अजय महिरे, गोरख राठोड, राजाराम चव्हाण, श्री. राठोड, मुलचंद राठोड हे जंगलात गस्त घालत असताना त्यांना ट्रॅक्टरचा आवाज  गस्त घालत असताना ट्रॅक्टरचा आवाज आल्याने त्यांना वाळूने भरलेले ट्रॅक्टर शिवापूर गावाकडे जाताना दिसले. या कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर चालकाने ट्रॅक्टर न थांबवता, कर्मचाऱ्यांच्या चक्क अंगावर चालविले. या घटनेत वनकर्मचारी लालचंद चव्हाण (वय २८) यांच्या पायावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर चाळीसगााव येथील डॉ. परदेशी यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान पाटणादेवी अभयारण्य जंगलातून डोंगरी नदी पात्र मधून मोठ्या  प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे.मात्र, वन विभागातील काही झारीतील शुक्राचार्य वन तस्करांसोबत मिलीभगत करून रेतीच्या आर्थिक गणितात गुंतले असल्याची चर्चा आहे. येथून होणाऱ्या वाळू तस्करी बाबत खोलवर चौकशी केल्यास अनेकांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *