भाजपा शासित उत्तर प्रदेश, बिहारसह मध्यप्रदेशात नदीपात्रात आढळले सडलेल्या अवस्थेत मृतदेह

राष्ट्रीय

नवी दिल्ली| सिटीझन मिरर वार्ता

 

कोराना महमारीच्या दुसऱ्या लाटेत भारतात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून सरकारी उपाययोजनांचा पर्दापाश समोर येऊ लागला आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर आता मध्य प्रदेशातही नदीच्या पाण्यावर मृतदेह तरंगताना आढळले आहेत. वरील विशेष म्हणजे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथे भाजपचे मुख्यमंत्री असून बिहार मध्ये भाजपा नितीश कुमार यांच्यासोबत सत्तेत आहे.
मध्य प्रदेशातल्या पन्नामधल्या रुंज नदीत ह काही मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी मात्र मोठा धसका घेतलाय.
पन्ना जिल्ह्यातून वाहणाऱ्या केन नदीला येऊन मिळणाऱ्या रुंज नदीत मृतदेहांचा खच पडलाय. पन्ना जिल्ह्याच्या नंदनपूर गावाजवळ हे मृतदेह किनाऱ्यावर येऊन धडकलेत.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास सहा मृतदेह आढळून आले आहे. या नदीच्या पाण्यात आणखीही मृतदेह असल्याची शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली. गेल्या तीन चार दिवसांपासून मृतदेह सापडण्याच्या घटना उघडकीस येत आहेत.
उत्तर प्रदेशात गंगा नदीत अनेक मृतदेह तरंगताना दिसून आल्यानंतर बिहार मध्येसुध्या नदी पात्रात मृतदेह तरंगताना दिसून आले.
यासर्व घटना समोर येऊ लागल्याने भाजपची चांगलीच पंचाईत झाली आहे. दरम्यान विदेशातील अनेक प्रसिद्ध वृत्तपत्रांमधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकारच्या सुस्त भूमिकेवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले असल्याने केंद्र शासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *