धनाजी नाना महाविद्यालयात सूर्यनमस्कार कार्यशाळेचे ऑनलाईन उद्घाटन

जळगाव

फैजपूर ता.यावल | डॉ.मोहन साळुंखे

येथील धनाजी नाना महाविद्यालय व आय. क्यू. ए. सी. यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या “कोरोना महामार्ग च्या कालावधीत सूर्यनमस्काराचे महत्त्व” या विषयावरील सहा दिवसीय कार्यशाळेचे  झूम ॲप द्वारे ऑनलाइन उद्घाटन प्राचार्य डॉ. पीआर.चौधरी  यांनी केले.

यावेळी प्राचार्य चौधरी यांनी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांचे कौतुक करताना सांगितले की, स्व. धनाजी नाना चौधरी व स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या सामाजिक सेवेचा आदर्श वारसा घेत शिरीष दादा कोरोना महामारीत  स्वतःची चिंता न करता अत्यंत तळमळीने  जनसेवा करीत आहेत. कोरोना सारख्या महामारीत जनतेच्या आरोग्य सुधारण्याची तळमळ पाहून सूर्यनमस्कार या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

उपप्राचार्य डॉ.उदय जगताप यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, धनाजी नाना महाविद्यालया नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. आ. शिरीषदादा चौधरी त्यांचे नेहमीच पाठबळ मिळत असल्याने समाजाच्या विकासात्मक व उन्नतीसाठी महाविद्यालयाकडून सतत  प्रयत्न सुरू असतात.

कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून महाविद्यालयाचे  शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिव मारतळा मार्गदर्शन करणार आहेत. सूर्यनमस्काराचे महत्त्व, बीज अक्षर,सूर्याच्या नाम उच्चारनाचे महत्व,विविध आसने याची सविस्तर माहिती सहा दिवसीय कार्यशाळेत सविस्तरपणे देण्यात येणार असल्याचे सांगितले.

धनाजी नाना महाविद्यालया च्या जिमखाना विभागाचे चेअरमन प्रा. डॉ.सतीश चौधरी चौधरी यांनी प्रास्ताविक केले.तर आभार प्रा.शिवाजी मगर यांनी मानले. या कार्यशाळेत एकूण १५३ जणांनी नोंदणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *