महिला सरकारी वकिलाची हत्या करणाऱ्या डॉक्टर पतीला जन्मठेप; सासर्‍याला चार वर्षांची शिक्षा

क्राइम जळगाव

सरकारी वकील रेखा उर्फ विद्या भरत राजपूत यांच्या खून प्रकरणात साक्षीदार ठरले महत्त्वपूर्ण


उशिने गळा व तोंड दाबून पती डॉ. भरत पाटील व सासरे लालसिंग पाटील यांनी खून केल्याचे न्यायालयात निष्पन्न


जळगाव | सिटीजन मिरर वार्ता

येथील प्रथम वर्ग न्यायालयातील सरकारी वकील रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत यांच्या खून प्रकरणात पती डॉक्टर भरत पाटील व सासरे लालसिंग पाटील यांना न्यायालयाने दोषी घोषित करून शिक्षा सुनावली आहे.पती डॉ.भरत पाटील यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ तर सासरे लालसिंग पाटील यांना कलम २०१ अन्वये ४ वर्षाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी सुनावली .

रेखा ऊर्फ विद्या राजपूत (वय ३५,रा. सुपारी बाग जामनेर) या जळगाव येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या चारित्र्यावर पती डॉ. भरत पाटील नेहमी संशय घेत होते. या संशयातून विद्या राजपूत यांचा उशीने तोंड व गळा दाबून खून करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पती डॉक्टर भरत पाटील हे कारागृहात होते तर सासरे लालसिंग पाटील हे जामिनावर बाहेर होते.

न्यायालयात या खटल्याकामी फिर्यादी गणेश सुरळकर, डॉ. राहुल जावळे, डॉ. राजेश मानवतकर, मुलगा दुर्वेश उर्फ सोनू, यांच्यासह तब्बल १९ जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या. यातील १४ साक्षी अत्यंत महत्वपूर्ण ठरल्या.

सरकार पक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *