खाकी वर्दीतील दर्दी कलावंत सपोनी पंकज विनोद कांबळे

विदर्भ सांस्कृतिक

यवतमाळ | राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी)

पोलीस खाते म्हटले की वेगवेगळ्या ठिकाणी असलेला पोलीस बंदोबस्त, गुन्ह्यातील तपासाची दिशा, गुन्हेगारीला आळा घालणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरीची कामे हे ओघाने आलेच. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस सेवेत असलेल्या प्रत्येकाला ताणतणाव येतो. अशा कर्तव्याच्या धावपळीत अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक  पंकज कांबळे स्वतःच्या कलागुणांना जोपासत पोलीस खात्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत.

सपोनि पंकज विनोद कांबळे यांना अगदी बालपणापासूनच कला, छंद जोपासण्याची आवड आहे. या आवडीतून त्यांनी वेगवेगळ्या मंचावरून आपल्या कलांचे सादरीकरण केले. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेताना त्यांनी काव्य, पथनाट्य, नाट्य, एकांकिका यातून कलेची जोपासना केली.

बीएससी एग्रीकल्चरचे शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन करून व्यासंग वाढवण्याचा प्राधान्य दिले. पुढे लिखान, वाचन, गायन, करिअर काॕऊंन्सिलींग व प्रेरणादायी विषयावर मार्गदर्शनही केले. यासोबतच विविध वृत्तपत्रातून प्रासंगिकसह वैचारिक विषयांवर लिखाणही केले. यासोबतच विविध जनजागृती, सामाजिक प्रबोधन व महामानवांवर गीत लेखन सुद्धा केले. एपीआय पंकज कांबळे यांचा ‘उडान’ कवीतासंग्रह तर ‘उजाडल्यानंतरचे स्वप्न’ हे आत्मचरिञ प्रकाशित झाले आहे. त्यांचा ‘शरीर विकणे आहे’ हा कथा संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

पोलीस खात्यातील कर्तव्य निभावत असतांनाही त्यांनी आपल्या कलेकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. पोलीस खात्यातील अधिकारी व कलेची जोपासना करणारा नागरिक म्हणून त्यांनी दोन्ही बाजू सक्षमपणे सांभाळल्या आहेत.

सपोनि पंकज कांबळे यांनी विविध संमेलनात कविता, गझल वाचन केले.  पोलिस खात्यात बजावलेल्या विशेष कामगिरीच्या बळावर त्यांना महाराष्ट्र शासनाचा विशेष सेवा पदक, केंद्र शासनाचे आंतरिक सुरक्षा पदक, सामाजिक सेवा परीक्षा विभागाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *