कोरोना बाधित महिलेवर नराधमांनी केला सामूहिक बलात्कार

क्राइम राष्ट्रीय

दोन अल्पवयीन आरोपींना अटक तर एक फरार


इंदौर|सिटीझन मिरर वार्ता

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांनी    कोरोना संसर्ग झाल्यानंतर घरीच क्वारंनटाईन असलेल्या महिलेवर  सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना  इंदौर शहरात उघडकीस आली आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दरोडेखोरांना ओळखले. यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीपैकी एकाचे नाव दीपक असे असून तो महिलेच्या शेजारी राहत होता. त्याने या युवतीला एकटे पाहून दरोड्याचे नियोजन केले होते. दीपक अद्याप फरार आहे. तो २ महिन्यांपूर्वी तुरूंगातून सुटला होता.

पीडित महिलेने एसएसपी राजेश रघुवंशी यांना सांगितले की, कोरोनाची लागण झाल्यानंतर ती आपल्या घरात एकटीचं राहत होती. गुरुवारी रात्री २ वाजता ती जागी झाली. तेव्हा तीन लोक तिच्या पलंगाजवळ उभे होते. दरोडेखोरांनी चाकू, कटर आणि कात्री दाखवत पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. महिलेने त्याला ५० हजार रुपये आणि दोन मोबाइल दिले. त्यानंतर तिघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

कोरोनामुळे कमकुवत झाल्यामुळे पीडिता या तिघांचा प्रतिकार करू शकली नाही. हातात चाकू आणि कात्री असल्याने हत्येच्या भीतीने मी आवाज काढू शकला नाही, असेही पीडितेने सांगितले. घटनेनंतरही ही महिला पोलिसांकडे जाऊ नये म्हणून एका आरोपीने पहाटे पाच वाजेपर्यंत तिच्या घराचे रक्षण केले. सकाळ झाल्यानंतर तो तेथून पळून गेला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *