समृध्दी केमिकल कंपनीत गाळ काढत असतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

जळगाव

जळगाव |सिटीझन मिरर वार्ता

जळगाव औद्योगीक वसाहतीमधील आर्गेनिक खते तयार करणारी समृध्दी केमिकल कंपनीत एका कुंडातील गाळ काढत असतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू  झाल्याची घटना आज शनिवार दिनांक १५ मे रोजी सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी तत्काळ घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांसह भेट देऊन

यासंदर्भात प्राप्त माहिती अशी की; एमआयडीसी मधील समृद्धी केमिकल कंपनीत ऑरगॅनिक खते तयार केली जातात. रमजान, अक्षय तृतीया सण असल्याने गेल्या तीन दिवसापासून कंपनीला सुट्टी होती. तिन दिवसानंतर रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (वय ३० ) रा. चिंचोली ता. यावल, दिलीप अर्जुन सोनार (वय ५४ मूळ खिरोदा ह.मु. कांचन नगर) आणि आणि मयूर विजय सोनार (वय ३०, रा. कांचननगर, जळगाव) तिन्ही कामगार आज नेहमी प्रमाणे कंपनीत आले. तीन दिवसांच्या सुट्टीमुळे कंपनीच्या अंडरग्राऊंड टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. हा गाळ काढण्यासाठी आज सकाळी सुरवात झाली. मात्र गाळ काढत असताना दु्र्दैवी घटना घटली.

मिळालेल्या माहितीनुसार तिघा कामगारांना कंपनीच्या अंडरग्राउंड मध्ये मल साचलेला गाळ काढण्याचे काम सोपविण्यात आले होते. हा गाळ साफ करत असताना तिघा कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *