बोगस बियाणे विक्री : अमळनेरच्या श्रीकृष्ण ऍग्रोवर कृषी विभागाचा छापा

जळगाव

मान्यता नसलेले एचटी. बीटी कापूस बियाणे जप्त


दुकान मालकावर गुन्हा दाखल


अमळनेर |सिटीझन मिरर वार्ता

मान्यता नसलेले एचटी. बीटी कापूस बियाणे विक्री  करणाऱ्या श्रीकृष्ण ऍग्रो व इरिगेशन या दुकानावर कृषी विभागाने छापा टाकून दुकान मालकाविरुद्ध बियाणे अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

कारंजा चौकातील श्रीकृष्ण ऍग्रो व इरिगेशन या दुकानांवर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरूण तायडे,भरारी पथकातील कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, तालुका कृषी अधिकारी भारत वारे, मोहीम अधिकारी प्रकाश महाजन, कृषी विस्तार अधिकारी अमोल भदाणे  नियमित निविष्ठा  तपासणी करायला गैले होते.या तपासणीत श्रीकृष्ण ऍग्रो व इरिगेशन या दुकानात गोल्ड नावाचे परवाना नसलेल्या बियाण्याचे पाच पाकिटे आढळून आली. या बियाण्याला जीएइसीची मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले. ही पाकिटेे जप्त करण्यात आली असून यातील एक पाकीट नागपूर येथील बीज प्रशिक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दुकान मालक जितेंद्र पाटील यांच्याविरुद्ध अनधिकृतपणे बियाण्याचा साठा करून विक्री करणे व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे हे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *