ब्लाउजने गळा आवळून सुनेने केली सासूची हत्या

क्राइम पुणे

मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या गुन्ह्याखाली सुनेसह मयतेच्या मुलाला अटक


पुणे | सिटीजन मिरर वार्ता

किरकोळ कारणावरून सुनेने सासूचा (बेबी शिंदे, वय ५०) ब्लाऊजने अडीच वर्षीय नातवा समोरच गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे घडला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सूनेसह मयतेच्या मुलास अटक करण्यात आलेली आहे.

पोलीस चौकशीत हत्येचे कारण समोर आले. नातवाने आजीचा खेळण्यासाठी घेतलेला मोबाईल खाली पडल्याने आजी नातवावर रागावली. यातून सासू-सुनेचे वाद होऊन सुनेने घरातील ब्लाउजने सासूचा गळा आवळून खून केला. हा प्रकार दिनांक २१मे रोजी घडला होता. हत्या केल्यानंतर मृतदेह राहत्या घराच्या टेरिसवर पोत्यात घालून लपवून ठेवला. मात्र, काही तासांनी टेरिसवर दुर्गंधी येत असल्याने इतरांना संशय आला हे पाहून सून पूजा शिंदेने पोत्यात टाकलेला मृतदेह ओढत ओढत शेजारील झाडीत लपवला. मात्र, इथंच सर्व बिंग फुटलं आणि घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *