बलात्कार प्रकरणात आरोपी असलेल्या आसाराम बापूची तब्येत खालावली

राष्ट्रीय

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तुरुंगातच दिला ऑक्सिजन


जोधपूर | सिटी मिरर वार्ता

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात आसाराम बापू सध्या राजस्थानमधील जोधपुर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूस तुरुंगातच ऑक्सीजन वर ठेवण्यात आले. कोरोना संसर्गातून   बरे झाल्यानंतर आसाराम    तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी त्यांची ऑक्सिजन पातळी ९२ पर्यंत झाली होती. तुरुंग प्रशासनाकडून त्यांना एम्समध्ये दाखल करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिल्याने तुरुंग प्रशासनाकडून आयुर्वेद यूनिवर्सिटीतून एका डॉक्टरला बोलावण्यात आले आहे. करवडच्या आयुर्वेदिक युनिव्हर्सिटीच्या डॉ. अरूण त्यांगी यांनी आसाराम बापूची तपासणी करून औषधे घेण्यास सांगितले आहे. डॉ. त्यागी यांनी सांगितले की, कोरोनामुळे आसारामला काही त्रास जाणवत आहे. त्याचा उपचार करण्यासाठी काही तपासणी करणे आवश्यक आहे. यातील काही तपासणी केवळ रुग्णालयातच करता येणार आहे. ज्यामुळे त्याला रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान,दोन दिवसांपूर्वी कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला ऐम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितलेे जात आहे. काही दिवसांपूर्वी प्रकृतीच्या कारणास्तव आसाराम बापूने राजस्थान उच्च न्यायालयाकडे जामीन अर्ज केला होता. परंतु, वैद्यकीय उपचार घेऊन बरे वाटल्यांनतर आसाराम बापू याला पुन्हा तुरुंगात दाखल करा असे आदेश देत उच्च न्यायालयाने आसाराम बापू याची याचिका फेटाळून लावली होती. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापू सध्या राजस्थानमधील जोधपुर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *