निंबी – कवडीपूर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ग्रामस्थांचे लसीकरण

विदर्भ

यवतमाळ |राजेश ढोले (जिल्हा प्रतिनिधी)

पुसद तालुक्यातील ग्रामपंचायत निंबी-कवडीपूर येथील सरपंच मयुरभाऊ राठोड व सदस्यांच्या पुढाकारातून  लसीकरण शिबीराचे आयोजन गजानन मंदिर साईविहार येथे करण्यात आले.

कोविड प्रतिबंधात्मक लस आरोग्य केंद्र फेट्रा येथे मिळते. परंतु तेथील गर्दी टाळण्यासाठी व केंद्रांचे अंतर जास्त असल्याने येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात  जवळपास ८० नागरिकांना कोवीशील्ड या लसीचे लसीकरण करण्यात आले.
या शिबीरासाठी सरपंच मयुरभाऊ राठोड ,प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी शरद ताटेवार ,संजय सूर्यतळ (ग्रा प.सदस्य ) संजय वानखडे (ग्रा प. सदस्य .) सुवर्णा बुरकुले ((ग्रा.स) सी.टी.पंडीतकर(ग्रा वि अधिकारी ) सामाजिक कार्यकर्ते अरुणभाऊ पाईकराव ,मनोज बुरकुले, चव्हाण सर,सुरज गेंदराव, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या राजुरकर मॅडम,गेडे मॅडम, गायकवाड मॅडम,लुंगारे मॅडम,श्री. मुंडे वआशा सेविका कांचना बहादुरे हे उपस्थित होते.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *