घरातून पळून जाणाऱ्या अल्पवयीन भावंडांसाठी पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार‌ ठरले देवदूत‌

जळगाव

मुलांची समजूत काढून केले पालकांच्या स्वाधीन


 

रावेर ( नजमोद्दिन शेख)


कौटुंबिक वादातून घरातून पळून जाणाऱ्या‌भुसावळ येथील अल्पवयीन भावंडांसाठी रावेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार ठरले. 

यासंदर्भात प्राप्त माहिती अशी की, जयप्रकाश यादव  यांची रेल्वे विभागांतर्गत मनमाड येथे लोको पायलट मधून बदली झाल्याने त्यांनी मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांच्या नानी कडे भुसावळ येथे मुलगी स्विटी जयप्रकाश यादव (वय १४) व मुलगा बिटू जयप्रकाश यादव (वय १२) यांचा सांभाळ करण्यासाठी ठेवले होते. जयप्रकाश यादव यांची पत्नी बिहार येथे पटना येथे गेली असताना नानीच्या घरी झालेल्या कौटुंबिक वादाचा राग मनात ठेवून स्विटी व बिटू या बहीण-भावंडांनी शुक्रवार दिनांक २ जुलै २०२१ तुझी कोणाला समजू न देता सकाळी सकाळीच रेल्वेने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेदरून गेल्यामुळे हे बहिण भावंड रावेर रेल्वे स्थानकावर उतरले . याचदरम्यान जळगाव येथे दवाखान्याच्या कामासाठी  जाण्यासाठी आलेले पो. कॉ. निलेश लोहार यांच्या पत्नीला हे दोघं बहिण भावंड अत्यंत घाबरलेल्या स्थितीत दिसून आल्याने त्यांनी याची माहिती तातडीने पतींना दिली.‌

‌ लोहार दांपत्याने या बहीण-भावंडांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून चौकशी केल्यानंतर त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. वडील जयप्रकाश यादव हे मनमाड येथे नोकरी निमित्त बदलून गेल्याने शिक्षणात अडथळे येऊ नये म्हणून या भावंडांना भुसावळ येथे नानीकडे ठेवले होते. दरम्यान या मुलांची आई बिहार राज्यात पाटना ईथे गेली असताना नानी कडे झालेल्या कौटुंबिक वादामुळे कंटाळून जाऊन रागाच्या भरात स्विटी व बिटू या अल्पवयीन भाऊ बहिणीनी कोणालाही समजू न देता भुसावळ रेल्वे स्थानक गाठून सकाळी सकाळी रेल्वेने प्रवास सुरू केला. मात्र, अत्यंत घाबरून गेल्याने स्वीटी व बिटू हे बहिण-भाऊ रावेर रेल्वे स्थानकात उतरून गेले. सुदैवाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रावेर येथे मागील काही महिन्यात समर्पित भावनेतून काम करून जनतेमध्ये लोकप्रिय झालेले पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार व त्यांची पत्नी जळगाव येथे दवाखान्याच्या कामासाठी येण्यासाठी निघाले असताना त्यांना हे दोघं बहिण भाऊ घाबरून गेलेल्या अवस्थेत दिसून आल्यामुळे त्यांनी या भावंडांची विचारपूस करून त्यांचे वडील जयप्रकाश यादव यांच्याशी फोन द्वारे मनमाड येथे संपर्क साधून मुले घरातून पळून जात असताना सापडल्याची माहिती दिली. मुलांची माहिती मिळताच फोन वरच जयप्रकाश यादव हे ढसाढसा रडू लागले.त्यांना नीलेश लोहार व त्यांच्या पतीने धीर देऊन मुलांची काळजी करू नका ते आमच्याकडे सुखरूप असल्याचे सांगितल्याने जयप्रकाश यादव यांना धीर आला. निलेश लोहार व त्यांच्या पत्नीने या भावंडांना घेऊन भुसावळ गाठले.मुलांच्या वडिलांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी भुसावळ येथे त्यांचे परिचित असलेले व रेल्वेत सेवेत असणारे त्यांचे नातेवाईक व मित्र असलेल्या अजयकुमार मंडल यांच्या स्वाधीन या बहिण भावांना केले. याचं दरम्यान या भावनांचे वडील मनमाड येथून भुसावळ येथे निघाले.

‌ सामाजिक दायित्व व कर्तुत्वाने कोरोना महामारी च्या काळात मागील दोन वर्षापासून सातत्याने दातृत्व भाव जोपासून कार्यरत असलेले रावेर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार व त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नीच्या सामाजिक संवेदना संदर्भात अनेक संस्था व संघटनांनी त्यांचा यापूर्वीच गौरव केलेला आहे. लोहार दाम्पत्याच्या संवेदनशील मनातील माणुसकीच्या भावनेचा परिचय गेल्यावर्षी लोक डॉन घोषित झाल्यानंतर आला होताच. गेल्यावर्षी लॉकडाउन घोषित झाल्यामुळे अनेक परप्रांतीय मजूर मिळेल त्या वाहनांनी तसेच पायी पायी मुंबई वरून अनेक संकटाचा सामना करत आपापल्या राज्यात निघाले असताना रावेर येथे या मजुरांच्या खाण्यापिण्याची, रहाण्याची, अंथरूण, पादत्राणे वगैरे साधन सुविधा पुरविण्यासाठी अक्षरशः जीव ओतून काम करणारे पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार हे जनतेच्या मनातील खरे हिरो ठरले होते.

या जनप्रीय पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार व त्यांच्या पत्नीने घरातून पळून जाणाऱ्या स्वीटी व बिटू या अल्पवयीन भावंडांना सहीसलामत त्यांच्या कटुंबीयांच्या स्वाधीन करून खऱ्या अर्थाने पोलीस दलाची प्रतिमा असलेल्या  सेवाभावाची प्रचिती दिली आहे.

 

 

Leave a Reply