भुसावळ येथील वाघमारे खून प्रकरणात आरोपी सचदेव दोषी ; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

क्राइम जळगाव

भुसावळ :- शहरातील पंचशील नगर येथील आनंद अशोक वाघमारे (वय २८)  या तरुणाच्या खून प्रकरणात आरोपी प्रल्हाद होलाराम सचदेव याला भुसावळ सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, दिनांक ६ मे २०१८ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पंचशील नगर येथील रहिवाशी युवक आनंद अशोक वाघमारे त्याचा मित्र अफजल पिंजारी यांच्या सोबत कामावरून घरी येत असताना दिलीप भालेराव यांच्या घरासमोर आरोपीने आनंद वर  चाकू भोसकून

खून केला होता.. मयताच्या पोटावर व पाठीवर चाकुचे तब्बल ११ वार करण्यात आले होते. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. हा खून जुन्या वादातून झाल्याची चर्चा होती. या दृष्टीने तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपी प्रल्हाद होलाराम सचदेव याला शिताफीने अटक केली होती.

सदर खून खटल्याचे कामकाज भुसावळ येथील सत्र न्यायालयात सुरू होते. सरकार पक्षातर्फे मयत तरुणाचा भाऊ चेतन वाघमारे,हसन तडवी, प्रकाश गायकवाड,डॉ. एन.ए.देवराज यांच्यासह १५ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीने खून केल्याचे न्यायालयात झाल्याने न्या.आर.एम.जाधव यांनी आरोपीला जन्मठेप तसेच २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खून खटल्यात सरकार पक्षातर्फे सहा.सरकारी अभियोक्ता प्रविण पी. भोंबे यांनी काम पाहिले. तपासाधिकरी पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख,पैरवी अधिकारी सहा.फौजदार समिना तडवी, केस वॉच गयास शेख यांनी काम पाहिले.

Leave a Reply