दिलासा : मंदाताई खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

जळगाव राजकीय

तूर्तास अटक न करण्याचे उच्च न्यायालायचे ईडीला निर्देश


मुंबई (सिटीझन मिरर वार्ता):-

पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांच्या पत्नी मंदा करण्याताई खडसे  यांना उच्च न्यायलयाने मोठा दिलासा दिला आहे.मात्र १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर पर्यंत तपास कामात  सहकार्य करावे अशा सूचना त्यांना न्यायालयाने दिल्या. तूर्तास मंदाताई खडसे यांना अटक करू नका असे निर्देश इडीला देण्यात आले आहेत. मात्र १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर पर्यंत तपास कामात  सहकार्य करावे अशा सूचना त्यांना न्यायालयाने दिल्या.

मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने मंगल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या पत्नी आणि याप्रकरणातील संशयित मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तसेच त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलं होतं.

इडीने खडसे कुटुंबियांविरोधात  याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.  आरोपपत्रात एकनाथराव खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे.

1 thought on “दिलासा : मंदाताई खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Leave a Reply