जागतिक ग्रामीण महिला दिनानिमित्त उमेद अंतर्गत कासोदा येथे एरंडोल तालुक्यातील बचतगटांना तब्बल ३ कोटी रुपयांचे कर्ज वाटप

जळगाव

गडेबचतगटांना मिळालेल्या कर्जामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळणार – महिलांनी व्यक्त केला विश्वास


कासोदा ता.एरंडोल (प्रतिनिधी) :- एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे जागतिक ग्रामीण महिला दिनानिमित्त उमेद  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, एरंडोल पंचायत समिती यांच्या मार्फत एरंडोल तालुक्यातील १४७ बचत गटांना ३ कोटी रुपयांचे कर्ज  वाटप करण्यात आले. महिला बचत गटांना मिळालेल्या मोठ्या कर्जामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळेल असा विश्वास महिलांनी व्यक्त करून कर्ज मिळाल्याने आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे (MSRLM) सहसंचालक तथा प्रकल्प संचालक मिनल कुटे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी हरेश्वर भोई, कासोदा पो. स्टे.च्या सहा.पोलीस निरीक्षक निता कायटे,  कासोदा सेंट्रल बँकेचे अधिकारी राजू शर्मा, आयसीआयसीआय बँक जळगाव चे ज्ञानेश्वर पाटील, बडोदा बँक एरंडोल चे योगेश निघोत, कासोदा ग्रा.पं.चे बंटी चौधरी,स्वप्नील बियाणी, तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाचे  गुलाब चव्हाण,बीएमआयबीसीबी चे महेंद्र सोनवणे,प्रशासकीय सहायक जितेंद्र पाटील,तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन दिक्षा अडकमोल,उज्वला पाटील आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाचे गुलाब चव्हाण यांनी केले. सूत्र संचालन तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन दिक्षा अडकमोल यांनी केले. यशस्वितेसाठी उज्वला पाटील व बँक सखी यांनी प्रयत्न केले.

 

Leave a Reply