दर्जेदार शिक्षणातून सक्षम पिढी घडवूया – आ.शिरीषदादा चौधरी

जळगाव

फैजपूर / इरफान शेख (प्रतिनिधी)

                 शिक्षण हीच व्यक्तिगत, सामाजिक आणि वैश्विक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. शैक्षणिक संस्था समाज उद्धाराचे केंद्र बनली पाहिजे. सर्वांच्या सहभागातून दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून समाज उभारणीसाठी कटिबद्ध राहू असे मत मा श्री शिरिषदादा चौधरी अध्यक्ष, तापी परिसर विद्या मंडळ फैजपुर तथा आमदार रावेर – यावल विधानसभा मतदार संघ यांनी व्यक्त केले.


फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आयोजित संस्था पदाधिकारी यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी आ. शिरिषदादा चौधरी बोलत होते.
तापी परिसर विद्या मंडळ, फैजपुर ची कार्यकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने निर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. शिरिषदादा चौधरी हे होते.
यावेळी प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी कर्मयोगी दादासाहेब धनाजी नाना चौधरी, लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचा समृद्ध वारसा तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे अध्यक्ष आ. शिरिषदादा चौधरी यांनी चालवला असून शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रात धनाजी नाना महाविद्यालयाने दर्जेदार शिक्षण पुरवण्यात नावलौकिक मिळविला आहे. असे सांगून आतापर्यंत मिळवलेल्या सर्व उपलब्धीचे श्रेय  संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना  जाते असे गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आ. शिरीषदादा मधुकरराव चौधरी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर काशिनाथ चौधरी, मिलिंद शंकरराव वाघुळदे – उपाध्यक्ष, चेअरमन  लीलाधर विश्वनाथ चौधरी ,व्हा.चेअरमन प्रा.किशोर रामदास चौधरी,सचिव प्रा. मुरलीधर तोताराम फिरके, सहसचिव नंदकुमार आसाराम भंगाळे, यांच्यासह कार्यकारी मंडळ सदस्य ओंकार वामन सराफ, डॉ. शशिकांत सदाशिव पाटील,  संजय काशिनाथ चौधरी, यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, औषधनिर्माण पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एल. चौधरी, शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पिंगला धांडे हे उपस्थित होते. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून कार्य केल्याबद्दल प्राचार्य डॉ. व्ही. आर.पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी प्राचार्य डॉ. आर. एल. चौधरी, मानद सचिव प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी व निवडणूक सहाय्यक  नितीन सपकाळे यांचाही  सत्कार करण्यात आला.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त प्राध्यापक व कर्मचारी यांचा शासन अटींच्या आधिन राहून सेवापूर्ती सोहळा आयोजित केला गेला नव्हता त्याचे औचित्य साधून उपस्थित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या  वतीने उपाध्यक्ष डॉ. सुधाकर काशीनाथ चौधरी यांच्या हस्ते डॉ. सिंधू. एन. भंगाळे, प्रा एम. के. नाथ , प्रा. वाय. जी. वारके,  पी. जी. महाजन, हुसेन तडवी यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष  डॉ. सुधाकर काशिनाथ चौधरी, सहसचिव प्रा. नंदकुमार आसाराम भंगाळे, कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. शशिकांत सदाशिव पाटील व प्राध्यापकांच्या वतीने डॉ. सतीश चावदस चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने  आर. एस. सावकारे यांनी मनोगते व्यक्त केली.  सूत्रसंचालन लेफ्ट. डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले. तर आभार उपप्राचार्य डॉ. ए. आय. भंगाळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *