प्रामाणिकपणा : सापडलेले पैशांचे पाकिट दोघा मित्रांनी केले परत

जळगाव

• हिमांशू छाजेड व संभव जैन यांचा पोलीस उपअधिक्षकांकडून गौरव


जळगाव / सिटीझन मिरर वार्ता

शिरसोली रस्त्यावर सकाळी सायकलिंग करत असताना कृष्णा लॉन जवळ सापडलेले पैशांचे व महत्त्वाचे कागदपत्रे असलेले पाकिट हिमांशू रितेश छाजेड (रा.विनोबा नगर) व संभव उल्हास जैन (रा.आदिनाथ सोसायटी,शिवराम नगर ) यांनी त्यांच्या पालकांच्या मदतीने पाकिट धा शोध घेऊन परत केले.

हिमांशू व संभव हे दोन्ही मित्र जळगाव शहरातील रस्तमजी इंटरनॅशनल स्कूल चे विद्यार्थी आहेत. ते रोज सकाळी नियमित शिरसोली रस्त्यावर सायकलिंग करण्यासाठी जात असतात. बुधवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी नेहमी प्रमाणे ते सकाळी सायकलिंग करत असताना शिरसोली रस्त्यावर कृष्णा लॉन जवळ त्यांना पाकीट सापडले. याची माहिती त्यांनी आपल्या पालकांना फोन करून देत पाकीट उघडून पाहिले असता त्यात १५०० रुपये व काही महत्त्वाचे कागद मिळून आले. पाकीटातील कागदपत्रे तपासल्यानंतर ते नशिराबाद येथील पंकज रमेश  रंधे यांचे असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांचा शोध घेऊन हिमांशू व संभव या मित्रांनी त्यांना परत केले. प्रामाणिक पणाबद्दल जळगाव मुख्यालयाचे पोलीस उप अधिक्षकांनी हिमांशू छाजेड व संभव जैन यांचा गौरव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *