त्रिपुरा घटनेचे पुसद शहरात पडसाद : दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता

क्राइम विदर्भ

                    घटनेची माहिती मिळताच यवतमाळ पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पुसद शहरात दाखल


पुसद | राजेश ढोले ( यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)

त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने महाराष्ट्र राज्यभर आपली दुकाने, व्यवसाय बंद ठेऊन शुक्रवारी निषेध व्यक्त केला. पुसद शहरातही मुस्लिम समाजाने स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेऊन त्रिपुरा येथे झालेल्या घटनेचा धिक्कार केला. परंतु या बंद आंदोलनाला गालबोट लागून दगडफेक झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ हे पुसद शहरात दाखल झाले. त्यांनी पोलिसांना विविध सूचना केल्या. दरम्यान पुसद शहरात तणावपूर्ण शांतता आहे.


“त्रिपुरा येथील‌ घटनेचे पडसाद असोदा शहरात उमटले आहेत.नागरिकांनी कोणत्याही आपल्याला बळी न पडता शांतता ठेवावी. शहरात जाणीवपूर्वक दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

‌‌   ‌         –सहाय्यक जिल्हाधिकारी सावन कुमार


     यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की,  त्रिपुरा येथे धार्मिक दहशतीमुळे सुरू असलेल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात बंद पुकारला होता.पुसद शहरातही मुस्लिम समाजाने आपला व्यवसाय व दुकाने बंद ठेवून निषेध आंदोलनात सहभाग नोंदवला.  शहरातील शिवाजी चौकात दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र दुकाने बंद करण्यास नकार देणार्‍या दुकानदारास मारहाण होत दगडफेक झाल्याची  चर्चा अचानक शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

शहरातील व्यापारी वर्ग, आ. निलय नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, विनोद जिलेवार, चेंबर ऑफ कॉमर्सचे सुरज डुब्बेवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन शहरातील शांतता ठेवण्यासाठी  घटनेला जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, पुसद शहरातील काही दुकानाची नासधूस व वस्तूंची चोरी झाल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणाचा तपास करून दोषी असणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करण्याचे प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली.

घटनेचे वृत्त कळताच यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला,

Leave a Reply