कृषी कायदे रद्द झाल्याने लोकसंघर्ष मोर्चाने जळगावात केला जल्लोष

जळगाव

बळीराजाचा विजय, मात्र लढाई अजून बाकी आहे- लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे


 जळगाव / सिटीझन मिरर वार्ता

गेल्या वर्षी जून महिन्यात संसदेत कोणतीही चर्चा न करता तीन कृषी कायदे मंजूर करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार विरोधात देशभरातील शेतकरी विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या ताकतीने वर्षभरापासून किसान क्रांती मोर्चाच्या माध्यमांतून आंदोलन छेडून तिन्ही काळे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी ठामपणे लावून धरली आहे. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरु नानक  देव जी यांच्या जयंतीदिनी जाहीरपणे माघार घेऊन तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा होताच राष्ट्रव्यापी किसान क्रांती मोर्चाचे घटक असलेल्या लोकसंघर्ष मोर्चाने जळगाव शहरात जल्लोष करून शेतकरी एकजुटीच्या  जोरदार घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्यायकारक तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्याने बळीराजाचा विजय झाला असला तरी अजूनही लडाई संपलेली नाही अशी प्रतिक्रिया लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शेतकरी हिता विरोधातले तिन्ही काळे कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी साम,दाम,दंड,भेद, नीतीचा वापर झाल्याचे पहावयास मिळाले होते.आंदोलन दडपण्याचे प्रयत्न होऊनही न डगमगता शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. आंदोलनादरम्यान सुमारे ७०० शेतकऱ्यांचे बळी गेले. यात लोकसंघर्ष मोर्चाच्या सीताबाई तडवी यादेखील शहीद झाल्या होत्या.


लोकसंघर्ष  मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या जळगाव शहरात जल्लोष – 

तिने कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केल्यानंतर जळगाव शहरात लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, भरत कर्डिले,प्रमोद पाटील,पियूष नरेंद्र पाटील,फारुख शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी शास्त्री टॉवर चौकात शेतकरी एकजुटीच्या जोरदार घोषणा देऊन जल्लोष साजरा केला. यावेळी शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्या सीताबाई तडवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.


शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेत्या    लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांनी प्रतिक्रिया सांगितले की, पंजाब व उत्तरप्रदेश च्या निवडणुका समोर असल्या तरी वर्षभर या दुराग्रही सरकारच्या समोर नेटाने अहिंसक लढाई लढत केंद्र सरकारला घुटण्यावर आणत घाम फोडला म्हणून केंद्र सरकारला तिन्ही काळे कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.मुळात हे तिन्ही कायदे रद्द झाले असले तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला बाजारसमित्या व खाजगी व्यापाऱ्यांनी हमीभाव दिलाच पाहिजे हा प्रश्न बाकी आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शेतकरी हिताच्या शिफारशींची अंमलबजावणी ह्या मागण्यांसाठी हा लढा सुरूच राहील.

 

Leave a Reply