फैजपूर येथील सुभाष चौक ते बसस्थानकापर्यंत असलेल्या रस्त्याचा नामोल्लेख नगरपालिकेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग करावा – पप्पू मेढे यांची मागणी

जळगाव

फैजपूर |सलिम पिंजारी

शहरातील अंकलैश्वर – बऱ्हाणपूर रोडवरील   सुभाष चौक ते बस स्थानक पर्यंत रस्त्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग असे नामकरण तत्कालीन नगराध्यक्षा  सौ.अमिता हेमराज चौधरी यांच्या कार्यकाळात २०१२ साली  नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव पारित केला आहे.मात्र या रस्त्याचा नामोल्लेख  अजूनही अंकलैश्वर – बऱ्हाणपूर असा केला जात असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर होत आहे.ही बाब खपवून घेणार नाही असा इशारा देऊन  भीम ग्रुपचे अध्यक्ष पप्पू मेढे यांनी सदर रस्त्याचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर असा  नामोल्लेख न करणांऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे  सांगितले आहे.

फैजपूर नगरपालिकेने अंकलैश्वर – बऱ्हाणपूर रस्त्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग असे नामकरण केल्यानंतर पूर्वीच्या छत्री चौक व आताच्या स्व. बापू आणि चौकात नामांतराचा फलक लावलेला आहे. मात्र नगरपालिकेकडे कडूनच या रस्त्याचा उल्लेख सता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग असा न करता  अंकलैश्वर – बऱ्हाणपूर रोड असा केला जात असल्याने जनतेत रोष व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply