शाळा पूर्व तयारी मेळावा चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथे जि. प. शाळेत संपन्न

जळगाव

चोपडा / प्रतिनिधी

शासनाच्या निर्णयानुसार सन २०२२ -२३ या शैक्षणिक वर्षात इ. १ ली मध्ये दाखल होणा-या ६ वर्षावरील बालकांसाठी शाळा पूर्व तयारी मेळावा दिनांक १९ एप्रिल  २०२२ रोजी चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला सरस्वती पूजन करण्यात आले.  यांनतर लेझीम पथकासह पालकांच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेली  प्रभातफेरी लक्षवेधी ठरली.ग्रामपंचायत सदस्य जहांगीर तडवी यांनी फित कापून मेळाव्याचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी सरपंच भूषण पाटील हे होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती.हाफिजा तडवी, दिनेश सोनार,  रविंद्र पाटील,  लतीब तडवी, सामाजिक कार्यकर्ते  हैदर तडवी, संजय तडवी, रमजान तडवी,  भगवान अढाळके, रामदास पावरा,  निसार तडवी,अंगणवाडी सेविका श्रीमती कुसुमाग्रज पाटील, श्रीमती बेबाबाई तडवी व स्वयंसेवक यांची उपस्थित होती.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंगला पाटील  यांनी आपल्या मुलांना पालकांनी नियमित शाळेत पाठवावे असे आवाहन करून पालकांनी गावातील शाळेला प्रथम प्राधान्य द्यावे असे सांगून  शाळेत पहिल्यापेक्षा झालेला बदल याची माहिती दिली. यावेळी नवीन विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, फुगे व चाॅकलेट देऊन स्वागत करण्यात आले.

शाळा पूर्व तयारी चा दुसरा मेळावा जून महिन्यात घेण्यात येणार असून बालकांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल अशी माहिती यावेळी पालकांना देण्यात आली.

मार्च२०२० पासून कोविड १९ च्या महामारी मुळे अंगणवाडीत जाऊ न शकलेल्या बालकांमध्ये  शाळेची गोडी निर्माण व्हावी हा शाळा पूर्व तयारी मेळाव्याच्या उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर वरगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने बालकांच्या सर्वांगीण विकासास पोषक असे वेगवेगळे उपक्रम व कृती करून पालकांची जागृती केली.यावेळी विद्यार्थ्यांचा शारिरीक, बौध्दीक, सामाजिक, भाषा विकास, गणन पूर्व तयारी या स्तरातून चाचपणी करण्यात आली.

मेळाव्यात बालकांसाठी कृतीपुस्तिकेचे  वाटप करण्यात येवून त्यातील कृती करून घेण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.शाळेने बालकांच्या मनोरंजनासाठी सेल्फी पाॅईंट, माझी ओळख, बालगीतांचे आयोजन व विविध वस्तूंनी ७ स्टाॅल सजवलेले होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे शिक्षक राकेश पाटील यांनी केले . आभार शाळेच्या शिक्षिका श्रीमती आशा सोनवणे यांनी मानले.

 

 

 

Leave a Reply