कचरा जाळतांना वापरुन फेकलेल्या बॉडी स्प्रे बाटलीचा स्फोट : जळालेले धर्मेंद्र बोथरा यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू

जळगाव

आपले व्यक्तिमत्त्व उठावदार व्हावे इतरांवर आपला प्रभाव पडावा अशी प्रत्येकाची ईच्छा असते.यासाठी विविध सौंदर्यप्रसाधने वापरून आपले व्यक्तिमत्व आकर्षक केले जाते.मात्र, वापरून झाल्यावर साैंदर्य प्रसाधने कचऱ्यात फेकल्या नंतर त्याचे काय दुष्परिणाम होतील याचा कोणताही विचार केला जात नाही. वापरलेली सौंदर्यप्रसाधने कशी जीवघेणे ठरू शकतात हे जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील श्रीराम कॉलनी मध्ये झालेल्या घटनेवरून लक्षात येईल.


जळगाव /सिटीझन मिरर वार्ता

अंगणात पडलेला कचरा जाळतांना कोणीतरी वापरून कचऱ्यात फेकून दिलेल्या बॉडी स्प्रे चा स्फोट झाल्याने जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील श्रीराम कॉलनी मधील रहिवाशी धर्मेंद्र जैन (बोथरा) वय ५१ हे जळाल्याने त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. आता त्यांची प्रकुती स्थिर आहे.

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चांदीच्या दागिन्यांचा फिरता व्यवसाय करणारे धर्मेंद्र जैन (बोथरा ) यांनी दोन दिवस दिवसांपूर्वी त्यांच्या अंगणात व रस्त्यावर असलेला केरकचरा झाडूने साफ करून एका जागी जमा करून तो जाळत असतांनाच कचऱ्यात कोणीतरी वापरून फेकून दिलेल्या रिकाम्या बॉडी स्प्रे बाटलीचा अचानक स्फोट झाला.या घटनेत धर्मेंद्र जैन (बोथरा) उर्फ डी.के. यांचा उजवा हात पूर्ण जळाला असून उजवा गाल भाजला आहे.

Leave a Reply