खळबळ : जळगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा मृतदेह आढळला

क्राइम जळगाव

घातपात की अन्य काही या दृष्टीने पोलीस तपास सुरू

जळगाव / सिटीझन मिरर वार्ता

दोन व्यक्तींचा वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळून आल्याने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. दोन्ही घटनेत घातपात आहे की अन्य काही कारणे आहेत याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, मेहरूण परिसरातील बंद पडलेल्या स्वीमिंग पूलमध्ये ५२ वर्षीय प्रौढाचा मृतदेह आढळून आला असुन कांचननगरातील लेंडी नाल्याजवळ देखील एका तरुणाचा मृतदेह सोमवारी सायंकाळी आढळून आला आहे. दोन्ही मृतांची ओळख पटली आहे.

मेहरूण परिसरातील जे. के. पार्कजवळच्या बंद जुन्या स्वीमिंग पूलमध्ये ५२ वर्षीय रोहिदास मोतीलाल निकुंभ (रा. तांबापूरा) यांचा मृतदेह तरंगताना काही नागरिकांना आढळून आला. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना फोन करून माहिती दिल्याने पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह पोलिस कर्मचारी गणेश शिरसाळे व राहुल रगडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून घटनेमागचे कारण शोधण्यासाठी जोरदार तपास सुरू केला आहे.

दुसऱ्या घटना कांचन नगर परिसरातील लेडी नाल्याजवळ घडली आहे. कांचन नगर परिसरातीलच ज्ञानेश्वर नरहर दुसाने (वय-३०) हा तरुण लेंडी नाल्याजवळ मृतावस्थेत आढळून आला. ज्ञानेश्वर दुसाने याला दारूचे व्यसन असल्याची प्राथमिक माहिती असून त्याच्या पश्चात वडील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

 

Leave a Reply