गैरवर्तन : आंदोलनादरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करून पळ काढणाऱ्या मनसे नेते संदीप देशपांडे अडचणीत; गृहराज्यमंत्र्यांनी दिले‌ कारवाईचे आदेश

मुंबई

मुंबई / सिटीझन मिरर वार्ता

महाराष्ट्रामध्ये आज मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली आहेत. दरम्यान, मुंबई येथे मशिदी समोर आंदोलन करताना महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की करत गैरवर्तन करून पळ काढणाऱ्या मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याविरुद कारवाई करण्यात यावी असे आदेश गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले आहेत.

मशिदी वरील भोंगे काढण्यात आले नाहीत तर ४ मे रोजी मशिदी समोरच हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यशासनाला दिला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलने सुरू करून ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठण सुरू केले. विशेष म्हणजे काही मौलवींनी समजुतीची भूमिका घेत भोंग्यांशिवाय अजान दिली.

दरम्यान,राज्यात कुठेही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. अशाच एका कारवाई मध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे  यांना ताब्यात घेताना शिवाजी पार्क परिसरामध्ये धक्काबुक्की झाली आणि एक महिला पोलिस कर्मचारी रस्त्यावर पडली.  राज्य सरकारने या प्रकाराची दखल घेतली आहे.

संदीप देशपांडे यांनी सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याच्या प्रकारावरून आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी देखील ट्वीट करत याची माहिती दिली आहे.

संदिप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांचेशी केलेल्या गैरवर्तनाबद्दलची माहिती मी घेतली असून सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त श्री. संजय पांडे यांना दिले आहेत.’ असे स्पष्ट केले आहे.

 

Leave a Reply