संतापजनक : मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचा पुजाऱ्याने केला विनयभंग; जळगाव शहरातील घटना, पोलिसात गुन्हा दाखल

क्राइम जळगाव

जळगाव / सिटीझन मिरर वार्ता

मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचा पुजाऱ्याने विनयभंग केल्याची संतापजनक घटना जळगाव शहरात घडली असून पुजाऱ्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील एका मंदिरात मागील काही दिवसांपासून नियमित देवदर्शनासाठी येत असलेल्या महिलेला महिनाभरापासून बालकदास महाराज नामक पुजारी वाईट नजरेने पाहत होता.याबाबत सदर महिलेने तिच्या पती कडे पुजाऱ्याची तक्रार केली होती.
सोमवारी विवाहित महिला तिच्या जावेसोबत नेहमीप्रमाणे मंदिरात पुजेसाठी गेली. यावेळी तिची जाऊ पुजा करुन मंदिराच्या बाहेर थांबली.
महिला मंदिरात एकटी असताना पुजारी राम बालकदास महाराज हा महिलेजवळ आला. त्याने तिला सिताराम म्हणण्यास सांगितले. महिला त्याकडे दुर्लक्ष करत बाहेर पडत असतांना पुजाऱ्याने महिलेचा हात धरला आणि तिचा विनयभंग केला. अचानक झालेला प्रकार पाहून आरडाओरड करत सदर महिला मंदिरातून बाहेर पडली.घडलेली हकीकत महिलेने मंदिराबाहेर उभ्या तिच्या जावेला, तसेच घरी आल्यावर पतीला सांगितली.
मंगळवारी बालकदास महाराज यांच्या विरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी पुजाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply