जळगाव शहरातील कुंटणखान्यात विकृत शौकीनांची रंगलेली मैफिल पोलिसांनी उधळली

क्राइम जळगाव

जळगाव / सिटीझन मिरर वार्ता

मागील अडीच वर्षात जळगाव शहरातील उच्चभ्रु वस्तीतील सुरू असलेले कुंटणखाने पोलीस कारवाई नंतर बंद पडतील असे वाटत असताना आजही अनेक वसाहतीत चोरून लपून गरजू महिलांना वाम मार्गाला लावून शौकिनांची शारीरिक भूक भागविणारा अनैतिक धंदे सुरू असल्याची चर्चा नेहमीच होत असते. असाच एक कुंटणखाना नवीन सम्राट कॉलनीत सुरू असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उघडकीस आणून गुन्हा दाखल केला आहे.

अडीच तीन वर्षांपूर्वी पिंप्राळा परिसरात एका अलिशान अपार्टमेंटमध्ये सुरू असलेला कुंटणखाण्यावर पोलिसांनी कारवाई केली होती.सदरचा कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेला राजकीय वरदहस्त असल्याची त्यावेळी जोरदार चर्चा रंगल्या होत्या. यानंतर राष्ट्रीय महामार्गालगतच्या खेडी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कुंटखान्यावर पोलिसांनी कारवाई केली होती.
जळगाव शहरातील गरीब व गरजू महिलांना हेरून त्यांना वाममार्गाला लावणारे अनेक दलाल सक्रिय असून असे दलाल आंबट शौकीन हेरून त्यांच्याकडून विशिष्ट रक्कम घेत त्यांना महिला पुरविण्याचे काम करत असल्याचे सांगितले जाते.नवीन सम्राट कॉलनीतील कुंटखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर धक्कादायक चर्चा रंगल्या आहेत.
नवीन सम्राट कॉलनीतील एक महिला स्वतःच्या घरातील एक खोली आंबट शौकिनांना‌ पाचशे रुपये घेऊन देत होती. दलाल महिलेला तितकीच रक्कम द्यावी लागत होती.शहरातील नवीन सम्राट कॉलनी परिसरात एक महिला स्वतःच्या घरात कुंटणखाना चालवत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाला मिळाली होती.

कुमार चिंथा यांच्या सूचनेनुसार बुधवारी पोलीस पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. पथकातील एका कर्मचाऱ्याने अगोदर जाऊन घटनास्थळ कुठे आहे याची खात्री केली. त्यानंतर एक पंच बोलावून त्याला बनावट ग्राहक म्हणून  पाठविले.

सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, महिला कर्मचारी मालती वाडीले, अर्चना पाटील, राजश्री बाविस्कर, सुनील पाटील, किरण धमके, रविंद्र मोतीराया, मीनल साकळीकर, महेश महाले यांनी नवीन सम्राट कॉलनीतील त्या घरावर छापा टाकला. घरात कुटंनखाना चालविणाऱ्या महिलेसह बनावट ग्राहक आणि आणखी २ महिला मिळून आल्या. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता एक महिला कुंटनखाना मालकीण होती तर दुसरी कमिशन घेणारी दलाल महिला असल्याचे समजून आले.घरातून एका पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply