सलाईन काढून डिस्चार्ज पेपरवर जबरदस्तीने सही घेतली; नवाब मलिक यांच्या वकिलांचा ईडी अधिकाऱ्यांवर आरोप

मुंबई

मुंबई /सिटीझन मिरर वार्ता

मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटकेत असणारे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी जे. जे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची सलाईन काढून डिस्चार्ज पेपरवर जबरदस्तीने सही घेण्यात आल्याचा आरोप नवाब मलिक यांचे वकील ऍड. निलेश भोसले यांनी ईडी अधिकाऱ्यांवर केला आहे. यासंदर्भात न्यायालयाने ईडी अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत अशी विनंती ऍड. भोसले‌ यांनी न्यायालयाला केली आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची प्रकृती अचानक‌त्यांना जेजे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले ‌. मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असून त्यांचा रक्तदाब स्थिर नाही. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे जेजे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते.

ईडी अधिकाऱ्यांनी रूग्णालयात येऊन नवाब मलिक यांचा जबरदस्तीने डॉक्टरांकडून डिस्चार्ज करवून घेतला. कोणतीही पूर्वसुचना न देता त्यांची सलाईन सुरू असताना सलाईन काढून पेपरवर सही घेण्यात आली, असा धक्कादायक आरोप वकिलांनी केला आहे.रूग्णालयात त्यांना पाण्याची बाटली देण्यातही हलगर्जीपण करण्यात आला. अद्यापही ईडीने मलिक यांना आरोपपत्राची प्रतही दिलेली नाही, असेही नवाब मलिक यांचे वकील एडवोकेट भोसले यांनी मुंबई सत्र न्यायालयाला विनंती करून‌ आरोपण संदर्भात  ईडी अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे.

 

 

Leave a Reply