विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे प्रतिक सपकाळे यांचा युवा भूषण पुरस्काराने गौरव

जळगाव

जळगाव / सिटीझन मिरर वार्ता

आंबेडकरी चळवळीतील युवक कार्यकर्ते तसेच आयटीआय च्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे धामणगाव गावातील प्रतिक सपकाळे यांना पुणे येथील निर्मिका फाऊंडेशन या संस्थेने युवा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्याला लोकप्रतिनिधी अनेक मान्यवर उपस्थित होते.महाकवी वामनदादा कर्डक यांचे नातू श्री. हरेशभाई देखणे हे निर्मिका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी कार्यक्रमात आपले विचार मांडताना सांगितले की, समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्यांचा यथोचित गौरव व्हावा हा उर्मिका फाउंडेशनचा उद्देश आहे. जळगाव येथील युवक कार्यकर्ता प्रतिक सपकाळे याने नेहमीच शोषित,वंचित घटकातील लोकांच्या न्याय, हक्कासाठी लढा दिला असून विद्यार्थी हिताच्या प्रश्‍नांसंदर्भात  केलेले कार्य अत्यंत महत्वाचे आहे.

प्रतिक सपकाळे यांना निर्मिका फाउंडेशनचा राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्काराने गौरव झाल्याबद्दल त्याचे जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक मान्यवरांनी व आंबेडकरी चळवळीतील नेते,कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply