बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्तीचा डोस पाजण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांचा आक्रमक पवित्रा

जळगाव

अचानक तपासणीत अनेक कर्मचारी गैरहजर…


विभाग प्रमुखांना बजावल्या कारणे दाखवा नोटीस…


जळगाव / सिटीझन मिरर वार्ता


महापालिका आयुक्त पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर डॉ. विद्या गायकवाड यांनी बेशिस्त मनपा कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फोडला आहे.कर्मचाऱ्यांना प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी आयुक्तांनी लक्ष घातले असून पहिल्याच दिवशी मनपाच्या इमारतीजवळ ते स्वतः कर्मचाऱ्यांची हजेरी घेत असताना अनेक कर्मचारी कामाची वेळ पाळत नसल्याचे आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत मनपाच्या विविध विभाग प्रमुखांची कानउघाडणी करत त्यांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कार्यकर्मचाऱ्यांची झाडाझडती घेताना त्यांनी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर अन्य विभागांचा अतिरिक्त कार्यभारही सोपविला आहे. त्यात उपायुक्त श्‍याम गोसावी यांच्याकडे आरोग्य विभागासह प्रभारी अतिरिक्त आयुक्त, अतिक्रमण व महिला- बालकल्याणचा अतिरिक्त भार सोपविला आहे. उपायुक्त प्रशांत पाटील यांच्याकडे महसूलसह मुख्य लेखा परीक्षक म्हणून अतिरिक्त कार्यभार, मुख्य लेखा अधिकारी असलेल्या चंद्रकांत वानखेडे यांच्याकडे सामान्य प्रशासनाचे उपायुक्त हा अतिरिक्त पदभार तर सहाय्यक आयुक्त अभिजित बाविस्कर यांच्याकडे विधी व वाहन विभागाचा,नगरसचिव सुनील गोराणे यांच्याकडे अभिलेख, दवाखाने व भांडार विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त, कार्यालय अधीक्षक चंद्रकांत वांद्रे यांच्याकडे घरकुल अधीक्षकासह आता प्रभाग समिती क्र. ४ चे अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार, प्रभाग समिती क्र. १चे अधिक्षक मणिराम डाबोरे यांच्याकडे ग्रंथपालपदाचा अतिरिक्त पदभार, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संजय पाटील यांच्याकडे प्रभाग क्र. १२ ते १५च्या पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त पदभार, आस्थापना विभागातील लिपिक अविनाश बाविस्कर यांच्याकडे कार्यालय अधिक्षकासह कोर्ट व रोजंदारी कार्यासनासह अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

नुकतेच निवृत्त झालेले आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी यांच्या नंतर लगेचच अपर आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या विद्या गायकवाड यांची जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्या जळगाव महापालिकेच्या पहिल्याच महिला आयुक्त आहेत.
त्यांनी महापालिकेच्या विविध विभागांना भेट देऊन कामाची पाहणी केली.यावेळी हजेरी पत्रकात बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या नावासमोर किरकोळ रजा लिहिल्याचे दिसून आले, पण त्यांचा रजेचा नोंदीला आढळून आला नाही. अनेक कर्मचारी अनधिकृतपणे गैरहजर असल्याचेही आढळून आले.प्रमुखांना कारणे दाखवाया गंभीर बाबी आढळून आल्यानंतर गायकवाड यांनी विभाग प्रमुखांना त्यासंदर्भात जबाबदार धरले आहे. ज्या- ज्या विभागात असे गंभीर प्रकार आढळून आले त्या प्रत्येक विभाग प्रमुखाला त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपल्या अखत्यारित कर्मचाऱ्यांच्या हजेरीच्या नोंदी तातडीने सादर कराव्यात, तसेच रजांच्या संदर्भात तपशील व सर्व नोंदी नियमित ठेवाव्यात, असेही त्यांनी बजावले आहे.


 

Leave a Reply