घरात घुसून वकिलास मारहाण; पाच जणांना अटक

क्राइम

पुणे/ सिटीझन मिरर वार्ता

पुणे-सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटीत राहणाऱ्या वकिलासह त्यांचे वडील आणि कामगाराला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

हनुमंत श्रीकांत पाटेकर (वय ३१, रा. कॉलनी नंबर ५, पंत नगर, जाधववाडी, चिखली), सुग्रीव भीमराव गायकवाड (वय ५७, रा. म्हेत्रे गार्डन जवळ, चांदणी चौक, चिखली), विनयकुमार आंबिकाप्रसाद यादव (वय २२, रा. शिंदे वस्ती, रावेत), दिलीप फुलचंद निर्मल (वय ३३, रा. चंदन नगर), शत्रुघ्न सुखदेव पोकळे (वय ३५, रा. फ्लॅट नंबर २, गणेश नगर, वडगाव शेरी) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

फिर्यादीअमित शहा यांची कात्रज येथे प्राणीमित्र संस्था आहे. त्यांनी एका कंपनीकडून चार दुचाकी घेतल्या होत्या. या दुचाकीचे काही पैसे परत करायचे राहिले आहेत. या कारणावरून थकीत हप्ते वसुली करणारे खासगी कंपनीतील आरोपी शहा यांच्या घरात शिरले. शहा यांनी घराचा दरवाजा उघडताच टोळक्यानं त्यांना दमदाटी करायला सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी शहा यांच्या वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून दुचाकीची चावी आणि मोबाइल हिसकावून घेतला. त्यांच्या कामगारालाही जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी त्याच्याकडीलही मोबाइल संच हिसकावून घेतला.घटनेनंतर आरोपी टोळक्याने वकिलाकडील दुचाकी जबरदस्तीने पळवून नेली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, उपनिरीक्षक तुषार भोसले, सोमनाथ कांबळे, संदीप साळवे, शिवाजी सरक आदींनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे.

Leave a Reply