बुद्ध पौर्णिमा व सखाराम महाराज यात्रोत्सवा निमित्त फरशी रोड येथे युवकांनी केले अन्नदान

जळगाव

अमळनेर / प्रतिनिधी

संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती दिन व शहरात सुरू असलेला संत सखाराम महाराज यांचा यात्रोत्सवातील पालखी सोहळ्या च्या पार्श्वभूीवर अमळनेर शहरातील फरशी रोड येथील युवकांनी अन्नदान केले.

संपूर्ण जगभरात बुध्द पौर्णिमा संपन्न झाली. याच दिवशी राज्यात प्रसिद्ध असलेल्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला पालखी सोहळा उत्साहात पार पडतो.यावेळी एक लाखाच्या संख्येने राज्यभरातून भाविक अमळनेर शहरात येत असतात.

शहरात आलेल्या यात्रेकरूंसाठी बुद्ध पौर्णिमेचा पावन दिनाचे औचित्य साधून फरशी रोड मित्र परिवारा च्या  युवकांनी केलेल्या मोफत अन्नदान उपक्रमाचा लाभ हजारोंच्या संख्येने नागरिकांनी घेतला.

फरशी रोड परिसरातील  दिनेश शिंपी, मनोज मोरे, विशाल सोनवणे, दादा मोरे, चेतन चौधरी, भैय्या मोरे ,बापू मोरे ,तात्या पाटील,शहारुखा पारधी, गोपाळ बिऱ्हाडे, राजेश धाप, आनंद सोनटक्के,टिन्या पाटील, राजू देवराज,गणेश नगराळे, सचिन बिऱ्हाडे, पप्पू सोनवणे, नयन मोरे, अजय बिऱ्हाडे, पवन बिऱ्हाडे,राज रामराजे,अक्षय सोनवणे, मयूर जेठवा यांच्यासह मित्र परिवाराने आयोजित केलेल्या मोफत अन्नदान कार्यक्रमात तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारांवर चालण्याचा युवकांनी संकल्प केला.

या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक करण्यात आले आहे.

Leave a Reply