. अमळनेर येथील पू.सानेगुरुजी न.पा.वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सह. पतपेढीचे नवनिर्वाचित संचालक श्री.युवराज श्रीपत चव्हाण यांना रघुनाथ रामभाऊ मोरे यांच्या तक्रारीवरून सहाय्यक निबंधकांनी अपात्र घोषित केले आहे.
अमळनेर / द सिटीझन मिरर वार्ता
मागील महिन्यात निवडून आलेले अमळनेर येथील पू.साने गुरुजी न.पा.वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीचे नवनिर्वाचित संचालक श्री.युवराज श्रीपत चव्हाण यांना श्री.किशोर पाटील, सहायक निबंधक (सहकारी संस्था) अमळनेर यांनी अपात्र ठरविले आहे.अपात्र ठरविण्यात आलेले युवराज श्रीपत चव्हाण हे अमळनेर नगरपालिकेत आरोग्य निरीक्षक आहेत. त्यांनी अनुसूचित जाती जमाती गटातून निवडणूक लढवली होती. त्यांचा विजय झाल्यानंतर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील काही उत्साही कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांचा जंगी सत्कार केला होता.
पू. साने गुरूजी न.पा.वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढी मध्ये संचालक पदी निवडून आल्यानंतर अमळनेर नगरपालिके च्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण यांचा केलेल्या सत्कार प्रसंगाचे छायाचित्र
शासकीय नोकरी लागताना दोनच अपत्य असल्याचे शपथ पत्र द्यावे लागते. लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय सेवेत असलेल्या अबकड संवर्गातील कर्मचाऱ्यांना २८ मार्च २००५ नंतर तिसरे अपत्य झाल्यास या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे. सन २००५ नंतर तिसरे अपत्य असलेले शेकडो कर्मचारी शासकीय सेवेत आहेत. अशा कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्याबाबत शासनाने आदेश दिल्याने २००५ नंतर तिसरे अपत्य असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे तिसरे अपत्य असणारे शासकीय कर्मचारी सहकारी संस्था,शिक्षण संस्था, देवस्थान संस्था आदी ठिकाणी निवडणुका लढवून निवडून आले असतील तर त्यांना शासकीय नियमांचा चांगलाच फटका बसणार आहे.
आरोग्य निरीक्षक युवराज श्रीपत चव्हाण यांनी तीन अपत्य असतांनाही पू.साने गुरूजी न.पा.वरिष्ठ कर्मचाऱ्यांची पतपेढी च्या संचालक पदाची निवडणूक लढवताना अपत्य बाबत खोटे शपथ सादर केले असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात यावे अशी तक्रार रघुनाथ रामभाऊ मोरे यांनी अमळनेर येथील सहायक निबंधक (सहकारी संस्था ) यांच्याकडे पुराव्यानिशी केली होती.तक्रार आल्याने सहायक निबंधकांनी युवराज श्रीपत चव्हाण यांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्याबाबत वेळोवेळी संधी देऊनही त्यांनी खुलासा सादर केला नसल्याने अखेर त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. युवराज चव्हाण यांच्या वतीने ऍड. उदय शिसोदे यांनी बाजू मांडली.
The rise of Citizen Mirror as India’s leading online news channel within a short span of its existence owes a lot to the vision of its chairman and editor-in-chief Bharat Sasane and the dedication and toil of its ever-growing team of Citizen Mirror professionals.