भीषण अपघात : भुसावळ – बोईसर बस वीस फूट खोल दरीत कोसळली; १५ जखमी,६ प्रवाशी गंभीर

राज्य

पालघर / नरेश पाटील
भुसावळ येथून बोईसर जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस २० फूट खोल दरीत कोसळल्याने १५ प्रवासी जखमी झाले असून त्यातील ६ प्रवसी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याने बस अनियंत्रित झाल्याचा आरोप अपघातातून वाचलेल्या काही प्रवाश्यांनी केला आहे.


अपघातातील जखमी प्रवाशी

चालक डी.एन.धनगर,वाहक दिपक शिंदे,यांच्या सह दर्शना थापत,क्रिष्णा सर्वोदय,कोमल सर्वोदय,योगिता सर्वोदय,उषा सर्वोदय,भारती कडव,आलम तडवी,देवेंद्र धांदे,सुधाकर पावले,महेंद्र शिवडे,योगिता शिंदे,ज्ञानेश्वर पाटील


मिळालेल्या माहितीनुसार दारूच्या नशेत बस चालविणाऱ्या ड्रायव्हर ची तक्रार प्रवाश्यांनी कंडक्टर कडे केली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले.अखेर बस अनियंत्रित झाल्याने २० फूट खोल दरीत कोसळली.


“आम्ही चालकाचे रक्ताचे नमुने घेतले आहेत,त्याची वैद्यकीय तपासणी केल्या नंतर अहवाल आल्यावर चालकावर कारवाई करण्यात येईल.”
आशिष चौधरी,उप नियंत्रक, पालघर विभाग, म. रा.


सदर अपघात पालघर जवळ वाघोबा दरी जवळ झाला असून अपघातानंतर काही वेळ मुबई – पालघर हायवे बंद करण्यात आला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तसेच अग्निशमन दलाच्या सहकार्याने पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन राबविले.


अपघात झाल्या नंतर महामंडळाचा कुठलाही अधिकारी पालघर ग्रामीण रुग्णालयात साधी माहिती घेण्यासाठी आले नव्हते.अपघात सकाळी सहा वाजता झाल्या नंतर नऊ वाजता पालघर डेपोचे व्यवस्थापक प्रवाश्यांची माहिती घेण्यासाठी हजर झाले.अपघात झाल्यानंतर सर्वप्रथम  ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका  घटनास्थळी दाखल झाली.जखमी प्रवाश्यांना पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील ६ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

Leave a Reply