यश : रावेर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी हर्षिका जितेंद्र पाटील दहावी परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण

जळगाव

रावेर / नजमोद्दिन शेख
दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक १७ जून रोजी ऑनलाईन घोषित झाला.या निकालाचे वैशिष्ठ म्हणजे यंदाही मुलांच्या तुलनेत मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त आहे. रावेर तालुक्यात देखील दहावी परीक्षेत अनेक मुलींनी घवघवीत यश मिळवले आहे.
रावेर शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत शिकणाऱ्या कू. हर्षिका जितेंद्र पाटील दहावी परीक्षेत ९०.२०% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. कोरोना महामारी मुळे शाळा कधी सुरू तर कधी बंद अशी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना हर्षिता ने अभ्यासाचे सुष्म नियोजन करून शाळेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाची तयारी सुरू ठेवली. ऑनलाईन वर्ग असल्याने अभ्यास करण्याला मर्यादा येत असतानाही आपल्या मुलीच्या अभ्यासात कोणताही खंड पडू नये म्हणून हर्षिकाला नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या तिचे वडील जितेंद्र प्रताप पाटील यांचेही विशेष कौतुक करावे लागेल. रावेर शहर व तालुका हा ग्रामीण मातीशी नाळ जोडणारा आहे. ग्रामीण भागात आजही मुलींना “परक्याचे धन” समजले जाते.परंतु मुलीला असलेली अभ्यासाची रुची,शिक्षणाची गोडी लक्षात घेऊन हर्षी का ला प्रेरित करणारे तिचे वडील जितेंद्र प्रताप पाटील व आई सौ.सुषमा पाटील हे अभिनंदनास पात्र आहेत.
हर्षिका च्या यशात सरस्वती विद्या मंदिर शाळेचे प्राचार्य श्री.राजकुमार जैन, तिचे वर्ग शिक्षक श्री.मोहन बारी तसेच अन्य सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.

Leave a Reply