अनाथ मतीमंद मुलांसोबत रिया थोरातने साजरा केला वाढदिवस

उत्तर महाराष्ट्र

शिरपूर / सिटीझन मिरर वार्ता

प्रत्येकाच्या आयुष्यातील वाढदिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस असतो.आई – वडील आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करतांना आनंदाच्या परमोच्च शिखरावर असतात. शुभेच्छांचा वर्षाव करून मित्र – मैत्रिणी आपल्या मित्रांच्या वाढदिवसाचा जल्लोष करतात. असाच पण.., आगळा वेगळा वाढदिवस अनाथ मतिमंद बालगृहातील मुलांच्या सोबत रिया थोरात या १३ वर्षीय मुलीने साजरा केला.


बोराडी शाळेतील शिक्षक प्रकाश हिरालाल थोरात व सौ.राजश्री प्रकाश थोरात यांची लहान मुलगी कु.रिया प्रकाश थोरात हीचा २३ जून रोजी १३ वा वाढदिवस होता.साहजिकच मुलीचा जन्मदिन हा अत्यंत चांगला साजरा करण्यासाठी आई – वडिलांनी तयारी केली असताना रिया थोरात हिने माझा वाढदिवस अनाथ मतिमंद विद्यालयातील मुलांसोबत मला साजरा करण्याचा विचार आई वडिलांकडे व्यक्त केला. मुळातच शिक्षक असल्याने वडील प्रकाश थोरात यांच्यात सामाजिक सुधारणा, सर्वसमानता,सभ्यता व संस्कार हा गुण होताच. यामुळे मुलगी रिया हिचा वाढदिवस तिच्या ईच्छेप्रमाणे अनाथ मतिमंद विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा निर्णय वडील प्रकाश थोरात व आई सौ.राजश्री थोरात यांनी घेतला.या निर्णयाला रियाची दीदी स्नेहा थोरात हिने सुद्धा अनुकूलता दर्शविली.

कै.बापुसो.एन.झेड.मराठे विधायक संस्था,थाळनेर संचलित अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह,शिरपूर येथे रिया थोरात हीचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मतिमंद मुलांना बिस्कीट वाटप करून स्नेह भोजन देण्यात आले.

रिया ने केक कापल्यानंतर सर्वच मतिमंद मुलांनी टाळ्यांचा गजरात “Happy Birthday riya didi” अशा शुभेच्छा देऊन जल्लोष केला. यावेळी रियाचे वडील प्रकाश थोरात,आई सौ.राजश्री थोरात,बहीण स्नेहा थोरात यांच्यासह शिरपूर येथील अनाथ मतिमंद बालगृहाचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply