पालघर मॉब लिचिंग प्रकरणातील आरोपीला कोरोना व्हायरसची लागण

मुंबई

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात झालेल्या तिघांच्या हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या एका ५५ वर्षांच्या आरोपीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी सध्या वाडा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यासोबत इतर २१ आरोपीही आहेत.

आरोपीला कोरोना झाल्याचं निष्पन्न झाल्याने कोरोनामुक्त वाडा तालुक्यात आता खळबळ माजली आहे. त्याच्या संपर्कात आलेले इतर आरोपी आणि पोलीस यांच्यासहीत काही जणांचे अलगीकरण करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आलीय. इंग्रजीत प्रकाशित होणाऱ्या एका राष्ट्रीय दैनिकात ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
मॉब लिंचिंगच्या या प्रकरणात एकूण ११० आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी २२आरोपींना कोरोनापासून संरक्षणासाठी वाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. २६मार्चला सर्व आरोपींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल एक तारखेला प्राप्त झाला. ज्यामध्ये एका आरोपीला कोरोना झाल्याची माहिती आहे. संबंधित रुग्णाला पालघर जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *