तर कर्णधार कुंबळेसाठी जीव देईल- गौतम गंभीर

क्रीड़ा

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जातो. या तडाखेबाज फलंदाजाने क्रिकेटशी संबधित अनेक विषयांवर भाष्य करतांना विविध विषयांवर मत मांडले. गंभीरने भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आणि माजी कसोटी कर्णधार अनिल कुंबळेच्या नेतृत्व गुणांचे कौतुक केले. बऱ्याच काळासाठी भारतीय टेस्ट संघाचे नेतृत्व कुंबळेकडे होते. अनिल कुंबळेच्या कर्णधारपदाच्या काळात भारताला तीन टेस्ट सामन्यात विजय मिळाला तर पाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

अनिल कुंबळेने भारतीय संघाचे २००७-०८ चा ऑस्ट्रेलिया दौरा, २००७ मध्ये भारतातच पाकिस्तान विरुध्दची मालिका आणि श्रीलंकेतील मालिकेत नेतृत्व केले होते. भारतीय क्रिकेट संघाकडून सर्वाधिक टेस्ट बळी घेणारा खेळाडू म्हणूनही अनिल कुंबळेची ओळख आहे. अनिल कुंबळेकडे भारतीय संघाची धुरा अशा काळात सोपविण्यात आली होती जेव्हा भारतीय संघात मोठे बदल करण्यात येत होते. महेंद्रसिंह धोनीकडे भारतीय संघाचे पुर्णपणे नेतृत्व देण्यात आले नव्हते. त्यावेळचे अनेक सहकारी अनिल कुंबळेच्या नेतृत्वगुणांचे आजही कौतुक करतात.

अशाच एका घटनेची आठवण काढतांना गौतम गंभीरने सांगितले की कशा प्रकारे अनिल कुंबळे आपल्या संघातील सहकाऱ्यांचे मनोबल वाढवायचे. २००८ साली ऑस्ट्रेलियाच्या विरोधातात भारतात झालेल्या मालिकेत माझ्यावर आणि विरेंद्र सेहवागवर विश्वास टाकला होता.

‘मला जर कोणासाठी जीव द्यायचा सांगितला तर मी कुंबळेसाठी जीव देईन’

एका क्रीड़ा वाहीनीशी बोलतांना गंभीरने २००८ चा ‘तो’ किस्सा सांगितला, ‘मी आणि सेहवाग रात्रीचे जेवण करत होतो. तेवढ्यात तिथे अनिल कुंबळे आले आणि म्हणाले की, या संपूर्ण मालिकेत काहीही झाले तरी तुम्ही दोघेच सलामीची सुरुवात करणार आहात. तुम्ही आठही इंनिगमध्ये शुन्यावर जरी आऊट झालात तरी माझे काहीही म्हणने असणार नाही. मी आजपर्यंत माझ्यावर असा ठाम विश्वास व्यक्त करणारा दुसरा कोणी पाहिला नव्हता. त्यामुळे मला जर कोणी जीव द्यायचा सांगितला तर मी अनिल कुंबळेसाठी जीव देखील देईल असे गौतम गंभीर याने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *