क्रिकेटपटू पठान बंधुनी वडोदरा पोलिसांना विटामिन-सीच्या गोळ्या केल्या दान,

क्रीड़ा सामाजिक

बड़ोदा :- टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि युसूफ पठाण या दोघा बंधुनी वडोदरा पोलिसांना कोविड-19 विरोधात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या विटामिन-सीच्या गोळ्या उपलब्ध करुन दिल्या आहेत . कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. तब्बल लाखो लोकांनी या व्हायरसमुळे आपला जीव गमावला आहे. भारतात देखील संक्रमितांचा आकडा ४०हजाराच्या पुढे गेला आहे. देशांत २४मार्च पासून करण्यात आलेले लॉकडाउन १७ मे पर्यंत अजून पुढे ढकलण्यात आले आहे. या काळात डॉक्टर, परिचारिका, पोलिस इतर देशाच्या स्थिती सुधारणेसाठी अथक परिश्रम घेत आहेत. देशभर लोकांनी सरकारने दिलेले नियम मोडू नयेत आणि अनावश्यक मेळावे, कार्यक्रम देखील घेऊ नयेत याची दक्षता पोलिस घेत आहे. वडोदरा शहर पोलिसही आपले काम योग्य रीतीने करीत आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी क्रिकेटर इरफान व यूसुफ हे पठाण बंधु पुढे सरसावले आहेत.
पठाण बंधूंनी वडोदरा पोलिसांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि कोरोना व्हायरस विरूद्ध लढ्यात दृढ राहण्यासाठी विटामिन-सीच्या गोळ्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. ट्विटरवर वडोदरा शहर पोलिसांनी क्रिकेटपटू इरफान व यूसुफ पठाण यांचे त सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *