जेष्ठ नागरिकांसह गरोदर महिला व लहान मुलांना घरबाहेर पडण्यास मनाई:- केंद्रीय गृह मंत्रलाय

राष्ट्रीय

दिल्ली :- ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना तसेच गरोदर महिलांना आणि १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना घराबाहेर पडता येणार नाही, असे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी यांनी दिले आहेत. कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

वृद्ध तसेच गर्भवती महिला आणि लहान मुलांना कोरोनाची लवकर लागण होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत.

देशात आतापर्यंत हजाराच्या वर लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला असून यात रोज भर पडत आहे. तसेच आतापर्यंत एकूण ४२ हजार पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *