अक्कलकुवा, खांडबारा, विसरवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील दुकानांसाठी आदेश

नंदुरबार

नंदुरबार:- लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात शासनाच्या निर्देशानुसार मर्यादीत वेळेत दुकाने सुरू करण्याबाबत शिथीलता देण्यात आली असून विसरवाडी, खांडबारा आणि अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात नगरपालिका किंवा नगर पंचायतीप्रमाणे वैद्यकीय सेवा, मेडीकल, भाजीपाला, किराणा दुकाने व दुध विक्रेते यांची दुकाने व आस्थापना त्यांच्या परवाना परवानगीनुसार पूर्णवेळ सुरू राहतील. उर्वरीत आस्थापना व दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३ मे २०२० च्या आदेशानुसार परवानगी देण्यात आलेली दुकाने सकाळी ७ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहतील. जिल्ह्यात ठरवून दिलेल्या वेळेव्यतीरिक्त कोणत्याही कार्यालयास वेळेत बदल करण्याचा अधिकार असणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *